फेरफार नोंद
फेरफार नोंद
या सोबत तत्कालीन जिल्हाधिकारी नांदेड श्री श्रीकर परदेशी सर यांनी तलाठी व महसूल अधिकारी यांचे साठी तयार केलेल्या महसूल मार्गदर्शिके मधील फेरफार या विषयी महत्वाची माहिती या सोबत पहा
या सोबतचे माहितीचे महत्व खालील नमूद मंजूर फेरफार नमुन्या दाखल पहावा
फेरफार क्र 780 दि 10.12.1947
गाव-औंध सिटी पुणे शहर
सर्वे न 80/1
क्षेत्र -16 एकर 6 गुंठे
मजकूर- *********यांनी ********* व ******** वैगेरे यास रु 64600 दि 22/10/1947 रोजी देऊन खरेदी खत करुन घेतले (नों)
वर नमूद नमुन्या दाखल फेरफार पाहिला असता त्यात खरेदी खताची नोंद तत्कालीन तलाठी व मंडल अधिकारी यांनी वेळोवेळी कित्येक फेरफार नोंदीत नमूद केल्याचे आढळत नाही
परिणामत: त्यामुळे जमीन litigation ,सिव्हिल व महसुली अपिले यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे
खरेदी खत बाबत नोंदणी क्र दिनांक सब रजिस्ट्रार ऑफिस हे न चुकता फेरफार मध्ये नमूद करणे हे अत्यंत आवश्यक आहे
फेरफार नोंद हरकत या सोबतचे नमुना 6 क मध्ये (विवादग्रस्त नोंदीचे रजिस्टर )मध्ये limitation act नुसार विहित कालावधीत हितसंबंधी यांनी नमूद करणे आवश्यक आहे
-रमाकांत माने
