Skip to content

About Us

दस्तावेज सेंटरमध्ये व्यवसाय मार्गदर्शन

banner-01

            दस्तावेज.कॉम हे त्या नागरीक / व्यावसायिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे, ज्यांना इंग्रजी भाषेतील संगणकीय ज्ञान आहे परंतू मराठी टायपिंग येत नसल्यामुळे शासकीय व रोजच्या व्यवहारातील कागदपत्रे टाईप करण्यात अडचण येते अशा लोकांसाठी आनंदाची गोष्ट अशी की, आपल्या वेबसाईटवर सर्व सर्व शासकीय व रोजच्या वापरातील कागदपत्रांचे आयते फॉरमेट देण्यात आलेले आहेत.

            महाराष्ट्र शासनाच्या कामकाजात मराठी भाषेत स्थान लक्षात घेता महाराष्ट्रातील जनतेला अत्यंत अल्प दरात विविध प्रकारचे दस्तावेज आयत्या स्वरुपात पुरविण्याचा आमचा मानस आहे.

उद्देश

 • महाराष्ट्रातील नागरिकांचे / ऑनलाईन सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांचे दस्तावेज संबंधी ज्ञान प्रबळ करणे, शासकीय कामकाजातील कागदपत्राविषयी योग्य ती माहिती देऊन नागरीक / व्यावसायिकांना आत्मनिर्भर बनविणे हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
 • दस्तावेज सेवा केंद्र हे संगणकीय माहिती असणाऱ्या परंतू मराठी टायपिंग न येणाऱ्या नागरीक / ऑनलाईन सेवा सेंटरमध्ये सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांसाठी पर्वणी आहे. दस्तावेज.कॉम या संकेत स्थळावर आपणास विविध प्रकारची कागदपत्रे अत्यंत सहज, सुलभ, कमी वेळात आणि तेही शासकीय नियमान्वये ठरविलेल्या फॉरमेटनुसार मिळतील. यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की, विविध प्रकारच्या कागदपत्राच्या मराठी टायपिंगसाठी इतर कुठेही न फिरता सरळ आपल्या कॉम्पुटर विंडोवर ही सुविधा उपलब्ध करून देणे हा आमचा महत्वाचा उद्देश आहे.
 • दस्तावेज सेवा केंद्र ग्रामीण, शहरी, महानगरीय गावांमधील नागरीक / ऑनलाईन सेवा पुरविणारे व्यावसायिकांसाठी शासकीय नियमान्वये मराठी भाषेतून दस्तावेज(कॉमन फॉरमेट) पुरविते.

चार प्रकारचे दस्तावेज सेवा केंद्र पुरविण्याचा आमचा मानस आहे.

 • महानगरीय सेवा केंद्र
 • शहरी सेवा केंद्र
 • ग्रामीण सेवा केंद्र
 • नागरीक लॉग-इन

            दस्तावेज सेवा केंद्र आपणास डिजिटल व ऑनलाईन स्वरुपात डायरेक्ट आपल्या कॉम्पुटर विंडोवर प्रदान करण्यात येणार आहे. दस्तावेज सेवा केंद्र आपल्या घरामध्ये / गावामध्ये / शहरमध्ये / महानगरामध्ये आपल्या हक्काचे केंद्र म्हणून उपयुक्त ठरणार आहे.

           दस्तावेज.कॉम या संकेतस्थळावर शासकीय कामकाजात वापरले जाणारे दैनंदिन कागदपत्रांचे दस्ते(कॉमन फॉरमेट) पुरविण्यात आले आहेत. ते कसे भरायचे याबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करण्यात आली आहे. यामागे आमचा महत्वाचा उद्देश हा आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरीक / ऑनलाईन सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांनी कोणताही शासकीय फॉर्म न घाबरता, कोणत्याही मध्यस्थाच्या हस्तक्षेपाविना भरावा.

              महाराष्ट्रातील तमाम नागरीक / ऑनलाईन डिजिटल सेवा पुरविणाऱ्या व्यावसायिकांना दस्तावेज.कॉम च्या माध्यमातून त्यांचे काम वेगवान होण्यास मदत होईल तसेच आमच्या संकेतस्थळाद्वारे त्यांना शासकीय दस्तावेज कसे काढायचे याबद्दल योग्य ते मार्गदर्शन मिळेल.

सेवा प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या घरातील पीसीवर तसेच गावामधील / शहरामधील / महानगरामधील दस्तावेज सेवा सेंटरमध्ये जाऊन आपणास हवी ती सेवा प्राप्त करू शकता. सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात येत असल्यास आपण दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता अथवा ई-मेल द्वारे कळवू शकता.

दस्तावेज सेवा केंद्र व्यावसायिकांसाठी लागणाऱ्या शासकीय तसेच इतर लीगल दस्ते वाजवी दरात पुरविते.

अर्जाचे शुल्क स्वीकारण्याची पद्धत

 • ONLINE NET BANKING
 • DEBIT CARD / CREDIT CARD
 • BHIM UPI
 • GOOGLE PAY
 • PHONE PAY