जमीन वाघोलीकर संरजाम पुणे
जमीन वाघोलीकर संरजाम पुणे
या सोबत सुभानराव बिन लक्ष्मणराव जाधवराव (वाघोलीकर) तत्कालीन जहागीरदार रा वाघोली ता हवेली यांनी त्यांचे मिळकतीचे दि 13 ऑगस्ट 1873 रोजी केलेल्या गहाण खताची कॉपी या सोबत….
सध्या वाघोलीकर या दप्तराचे संदर्भाने data collection सुरु आहे त्या दरम्यान हे गहाण खत मिळून आले
नोव्हेंबर 1817 मध्ये इंग्रजांनी पुणे घेतल्यावर त्यांना निरनिराळ्या ठिकाणी दप्तर सापडले ते फार अव्यवस्थित होते तेव्हा एल्फिन्स्टन यांनी दप्तराची माहिती असलेल्या लोकांना बोलावून आणले व जुनी दप्तरे लावण्यासाठी त्यांची नेमणूक केली
नाना फडणीस वाडा येथील दप्तर सुस्थितीत आढळले
सन 1863 मध्ये हे दप्तर एलीनेशन ऑफिस चे ताब्यात आले
या ऑफिस करीता सध्याच्या कौन्सिल हॉल समोरील दगडी इमारत बांधून पूर्ण झालेवर सदर दप्तर सन 1890 मध्ये सदर इमारती मध्ये आले
वर नमूद इमारती मध्ये सध्या पुणे पुराभिलेख या कार्यालयाचे व्यवस्थापणा खाली सदर दप्तर आहे
सदर दप्तरात डेक्कन कमिशनर दप्तर आहे
सन 1827 साली विभागीय आयुक्त यांचा अंमल संपुष्टात येऊन जिल्हेवारी अंमल सुरु झाला
त्या नुसार पुणे जिल्ह्या या साठी “दक्षिणेतील सरकारांचे एजंट ” नेमण्यात आला
सदर एजंट दप्तर वर नमूद कार्यालयात आहे या दप्तरातील रुमाल क्र 17 ते 20 यात प्रसिध्द ऐतिहासिक घराण्याच्या कैफियती आहेत
-रमाकांत माने
