महसुली रमाकांत माने
अत्यंत महत्वाचे
महसूल अधिकारी यांनी महसुली केस 1 वर्षाचे कालावधीवधीत निकाली काढणे संदर्भाने नोटिफिकेशन
सदर बाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 255 मध्ये सुधारणा होऊन सदर कलमा नुसार procedure सध्या प्रचलित आहे
सोबत नोटिफिकेशन
-रमाकांत माने
फेरफार नोंद
या सोबत तत्कालीन जिल्हाधिकारी नांदेड श्री श्रीकर परदेशी सर यांनी तलाठी व महसूल अधिकारी यांचे साठी तयार केलेल्या महसूल मार्गदर्शिके मधील फेरफार या विषयी महत्वाची माहिती या सोबत पहा
या सोबतचे माहितीचे महत्व खालील नमूद मंजूर फेरफार नमुन्या दाखल पहावा
फेरफार क्र 780 दि 10.12.1947
गाव-औंध सिटी पुणे शहर
सर्वे न 80/1
क्षेत्र -16 एकर 6 गुंठे
मजकूर- *********यांनी ********* व ******** वैगेरे यास रु 64600 दि 22/10/1947 रोजी देऊन खरेदी खत करुन घेतले (नों)
वर नमूद नमुन्या दाखल फेरफार पाहिला असता त्यात खरेदी खताची नोंद तत्कालीन तलाठी व मंडल अधिकारी यांनी वेळोवेळी कित्येक फेरफार नोंदीत नमूद केल्याचे आढळत नाही
परिणामत: त्यामुळे जमीन litigation ,सिव्हिल व महसुली अपिले यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे
खरेदी खत बाबत नोंदणी क्र दिनांक सब रजिस्ट्रार ऑफिस हे न चुकता फेरफार मध्ये नमूद करणे हे अत्यंत आवश्यक आहे
फेरफार नोंद हरकत या सोबतचे नमुना 6 क मध्ये (विवादग्रस्त नोंदीचे रजिस्टर )मध्ये limitation act नुसार विहित कालावधीत हितसंबंधी यांनी नमूद करणे आवश्यक आहे
-रमाकांत माने
जमीन कलम 85
या सोबत
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 85 जमीन वाटप या संदर्भाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी शासनास केलेला पत्रव्यवहार
या पत्रात कलम 85 संदर्भाने अत्यंत महत्वाची माहिती नमूद आहे
-रमाकांत माने
भोर संस्थान
विषयी मोडिलिपी कागदपत्रा वर आधारित माहिती या post मध्ये edit करीत आहोत
-रमाकांत माने
विषयी मोडिलिपी कागदपत्रा वर आधारित माहिती या post मध्ये edit करीत आहोत
-रमाकांत माने
जमीन महत्वाचे
कोकण येथील ज्या जमीनी वन संज्ञा यातून वगळल्या त्या बद्दल माहिती व इतर माहिती
जमीन मोजणी
इतर महत्वाची माहिती
-रमाकांत माने
अंधेरे मे एक प्रकाश
जय प्रकाश ”
ही घोषणा अखंड भारत भर ज्यावेळी चर्चिली जात होती त्या काल खंडाचे आम्ही साक्षीदार आहोत
जमीन विषयक अभ्यास व संशोधन करीत असताना गाव नमुना 1(क) 11 भूदान व ग्रामदान अंतर्गत दिलेल्या जमीनी या संदर्भात प्रत्येक तलाठी सजा अंतर्गत माहिती घेत असतो (सोबत संदर्भीय शासन निर्णय)
त्या वेळेस JP व विनोबा भावे या महनीय व्यक्तींची सतत आठवण येत रहाते
किंबहुना या दोन व्यक्तींचा माझे वैयक्तिक आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे
कित्येक वर्षा पूर्वी पवनार आश्रमात स्वर्गीय विनोबा भावे यांना त्यांचे एका शिष्य असलेल्या युवतीने सांगितलेली कैफियत (ज्यात तिच्या वडिलांचा झालेला दुर्दैवी मृत्यू या बाबतचे कथन होते)
आणि त्या नंतर शासना द्वारे झालेली CID चौकशी
ही अख्या महाराष्ट्र राज्यात चर्चिली गेली होती
व्यक्ती त्यांच्या निस्वार्थी कार्यामुळे अजरामर होतात हे या दोन व्यक्तींच्या कार्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध होते
भारतरत्न व लोकनायक श्री जयप्रकाश नारायण तसेच विनोबा भावे यांनी लक्षावधी युवकांना त्या काळात प्रभावित केले होते
