■ मृत्यूपत्र ■
● मृत्युपत्र (विल) म्हणजे काय?
कायदेशीर भाषेत विल म्हणजे विल करणार्या माणसाने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेचे काय करायचे यासंबंधी प्रदर्शीत केलेली इच्छा किंवा इच्छेची उद्घोषणा. थोडक्यात विल म्हणजे एखादया माणसाने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेचे वाटप कसे व्हावे यासंबंधीचा केलेला दस्तऐवज. हे वाटप करताना त्याच्या इच्छेबरोबरच त्याला आयुष्यात आलेले अनुभव, त्याचा दृष्टीकोन, त्याचे तत्वज्ञान या सार्या गोष्टींचा सामान्यतः प्रभाव पडतो आणि त्याप्रमाणे तो वाटप ठरवतो.
ते करताना तो काही नातेवाईकांना वगळू शकतो, काहींना त्यांच्या कायदेशीर हक्कांपेक्षा कमी किंवा जास्त देऊ शकतो. त्याचप्रमाणे नातेवाईकांना कुणाला काहिही न देता तो सगळी मालमत्ता एखाद्या संस्थेला दान करु शकतो किंवा त्याचा ट्रस्ट बनवू शकतो. अगदी त्याच्या वारसांना त्यांच्या हक्काप्रमाणे जरी द्यायचे असले तरी विल केल्याने गैरसमजाला किंवा संदिग्धतेला वाव राहात नाही. इथे आपण फक्त सर्वसाधारण विलचाच विचार करत आहोत.
● मृत्यूपत्र कोण करु शकतो?
जिचे मानसिक संतुलन व्यवस्थित आहे अशी कोणीही सज्ञान व्यक्ती तिच्या स्वतःच्या मालमत्तेसंबंधी विल करु शकते. लहान मूल किंवा जिचे मानसिक संतुलन ढळले आहे अशी व्यक्ती मृत्यूपत्र करु शकत नाही.
१. कायद्यानुसार १८ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती
२. मानसिकदृष्टया आरोग्यवान असलेल्या व्यक्ती
३. ज्यांच्याजवळ संपत्ती आणि जीवन विमा पॉलिसी आहे त्यांनी मुख्यत्वे आपले मृत्युपत्र लिहिणे आवश्यक आहे.
४. एखाद्या व्यक्तीने मृत्युपत्र लिहिले तरी ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत संपत्तीवर त्या व्यक्तीचाच अधिकार राहतो.
५. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच त्याची संपत्ती त्याच्या उत्तराधिका-याला मिळते.
६. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात अनेक वेळा मृत्युपत्र बदलू शकते. अशा वेळी कायद्यानुसार त्या व्यक्तीने शेवटचे लिहिलेले मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते.
● मृत्यूपत्र करणे आवश्यक आहे का?
कायद्याने मृत्यूपत्र करणे आवश्यक नाही, पण भविष्यात आपल्याच वारसदारांमध्ये भांडणे लागुन त्यांचे संबंध बिघडू नयेत म्हणून विल केलेले केव्हाही चांगले. अर्थात एकदा माणूस गेल्यावार त्याचे वारसदार कसे वागतील हे कुणाच्याही हातात नाही, पण कमीतकमी विल आहे म्हटल्यावर भांडणाची शक्यता कमी होऊ शकते.
माणूस आयुष्यभर अधिकाधिक संपत्ती मिळवण्याच्या मागे असतो, काही ठिकाणी तो नामांकनदेखील करतो, पण तेवढेच पुरेसे नसते. माणूस गेल्यावर त्याच्या संपत्तीची त्याच्या इच्छेप्रमाणे विभागणी आणि तीही कमी खर्चात करण्याचे काम विल करते. त्याचप्रमाणे ज्यांना त्या संपत्तीतील हिस्सा मिळणार असतो त्यांचेही काम सोपे होते तसेच कायदेशीर कामाला लागणारा वेळही वाचू शकतो.
● मालमत्तेचा हस्तांतरण कायदा १९८२ नुसार कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण हे दोन पद्धतीने होऊ शकते.
१) दोन जिवंत (किंवा कायदेशीररीत्या जिवंत जसे संस्था वगैरे) व्यक्तींमध्ये.
२) मृत्यूनंतरच्या माल मत्तेचे हस्तांतरण.
● मृत्यूनंतरच्या मालमत्तेचे हस्तांतरण दोन पद्धतीने होऊ शकते.
१) मृत्युपत्राने हस्तांतरण.
२) कायदेशीर तरतुदीने मालमत्तेचे हस्तांतरण.
कोणतीही मालमत्ता ही विहित मालकाशिवाय राहूच शकत नाही. एखादे व्यक्तीची स्वतःची मालमत्ता किंवा एकत्र कुटुंबातील फक्त त्याचे हिश्श्यापुरती मालमत्तेची विल्हेवाट तो जिवंत असताना मृत्युपत्राचे किंवा इच्छापत्राचे रूपाने करू शकतो. तो अधिकार त्याचाच आहे; मात्र त्याने असे मृत्युपत्र त्याचे हयातीत करून न ठेवल्यास कायदा उपस्थित होतो आणि योग्य त्या कायदेशीर तरतुदींनुसार मालमत्तेची विल्हेवाट हस्तांतरण होऊ शकते. मात्र मृत्युपत्राचा अंमल व्यक्ती मरण पावल्यानंतरच सुरू होतो. जिवंत व्यक्ती त्याचे हयातीत कितीही मृत्युपत्र भारतीय वारसा कायदा 1925 कलम 2 (ब) नुसार करू शकते; मात्र असे शेवटचे केलेले मृत्युपत्रच फक्त कायदा ग्राह्य धरतो. तसेच व्यक्तीचे हयातीत सादर केलेल्या मृत्युपत्रात कितीही वेळा बदल करू शकतो, त्याला इंग्रजीत कोडीसील’ म्हणतात; मात्र असे केलेले शेवटचे बदलपत्र (कोडीसील) फक्त कायद्याने ग्राह्य धरले जाते. मृत्युपत्राचा कायदा हा हिंदू, मुस्लिम, पारशी वगैरे धर्माकरिता थोड्या फार वेगळ्या स्वरूपात काम करतो.
हिंदू व्यक्तींचे बाबतीत हिंदू वारसा कायदा १९५६ कलम ३० मधील तरतुदींनुसारच होणे आवश्यक ठरते. भारतीय वारसा कायदा १९२५ कलम ६३ व पुराव्याचा कायदा १८७२ कलम ६८ व ७१ प्रमाणे मृत्युपत्र शाबीत करावे लागते.
माणसाच्या जन्माबरोबरच त्याच्या मृत्यु हि जन्म घेत असतो. आणि त्या हर एखाद्यला मृत्युपत्र किंवा Will याबद्दल विचारले तर त्यात वाईट किंवा नाराज होण्या सारखी गोष्टच काय? जो जन्माला आला तो कधी न कधी तरी जाणारच. आता जाण्या अगोदर संपूर्ण आयुष्यात त्याने जे काही कमावलेले असेल, भले तो माणूस लखपती, करोडपती नसेल त्याच्या वाटणीचे जे काही असते ते आपल्या पाश्चात कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला मिळावे अशीच त्याची इच्छा असते.
पण जर त्या व्यक्तीने आपले मृत्युपत्र तयार केलेले नसेल त्यातून मृत् पावलेली व्यक्ती कुटुंब प्रमुख असेल तर त्याच्या पाठीमागे जे वारस पात्र उरतात, त्यांना खरा लाभ मिळेपर्यंत त्यांचे हाल होतात, खूप मनस्ताप भोगावा लागतो, सर्व ठिकाणी मृत्युचा दाखला देवूनही प्रसंगी निराशा पदरी पडते आणि लाभ मिळण्यास विनाकारण उशीर होतो. पण जर मृत्युपत्र केले असेल तर मात्र हि प्रक्रिया खूप सोपी कमी कालावधीत होते. आणि आजकालच्या धकाधकीच्या, असुरक्षित जीवनात जिथे कधी काय होईल याचा नेम नाही. अशा वेळी साधारण ५० शीच्या आसपास मृत्युपत्र केले तरी हरकत काहीच नाही.
मृत्युपत्राची नोंदणी कायद्याने आवश्यक नाही पण केलेली असल्यास चांगले , म्हणजे आपली प्रत गहाळ झाल्यास सरकारी कार्यालयातून खरी प्रत मिळू शकते
● समाजात मृत्यूपत्र बाबत जे गैरसमज आहेत, ते दूर करण्याचा एक प्रयत्न :-
१) मृत्यूपत्र करण्या साठी वकिलाची गरज नसते; साध्या फुलस्केप पेपर वर किवा A४ साईझ पेपर वर सुद्धा ते करता येते. कोर्ट फी, स्टंप पेपर याचीही काही जरूर नाही.
२) तुम्ही स्वतः आयुषयात कमावलेल्या सर्व चल- अचल (Libalities & Assets) चा त्यात समावेश करावा.
३) जर वारस आज्ञानी, लहान , किवा मतीमंद असेल तर मृत्यूपत्र द्वारे एक विश्वस्त नेमावा जो सर्व प्रकारे अंमलबजावणीस जबाबदार असेल.
४) तुमचे मृत्युपत्र हे केव्हाही रद्द करता येते व बदलता येते, किंवा त्यात प्रसंगानुरूप हवे तेव्हा, हवे तेवढे बदलही करता येतात. पण नवीन मृत्युपत्रात , जुने मृत्युपत्र (तारखेचा उल्लेख करून) रद्द कले असे नमूद करावे अथवा ते फाडून नाहीसे करावे.
५) मृत्युपत्रावर किमान दोन विश्वस्तांची / साक्षीदारांची सही त्यांच्या नाव पत्ता सहित घ्यावी , पण जे वारस असतील ते विश्वस्त म्हणून सहीला पात्र नाहीत हे लक्षात घ्यावे.
६) मृत्युपत्र बनवल्यावर त्याची माहिती सर्व वारसांना द्यावी व त्यांना माहित आहे अशा ठिकाणी मृत्युपत्र ठेवावे.
आपल्या स्थावर मिळकतीचे/ सदनिकेचे हस्तांतरण व नोंदणी आपण धडधाकट व आरोग्यसंपन्न असताना होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मृत्युपत्रदेखील आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित असताना करणे गरजेचे आहे. मृत्युपत्र हे वय वष्रे ३५ ते ४० पर्यंत करणे सद्यस्थितीत उचित ठरेल.
● मृत्युपत्र लिहिताना खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्या :-
सर्वात प्रथम आपल्या सर्व संपत्तीची एक यादी करा. चल-अचल संपत्तीची माहिती, सर्व विमा पॉलिसी,यांचा समावेश त्यात असावा.
२. उत्तराधिका-यांची यादी :-
मृत्युपत्रात तुम्हाला ज्यांना संपत्तीचे वाटप करायचे आहे, अशा व्यक्तींची एक यादी तयार करा.
३. संपत्तीची निश्चितीकरण :-
कोणती संपत्ती कोणाला देणार आहात आणि कोणत्या हेतूने देणार आहात हे निश्चित करणे गरजेचे आहे. हे निश्चितीकरण करताना भविष्यातील विचार करणे आवश्यक असते. दबावाखाली येऊन मृत्युपत्र करणे चुकीचे आहे.
४. उत्तराधिका-यांचे टॅक्स प्लॅनिंग :-
मृत्युपत्रात तुम्ही ज्या व्यक्तींना आपल्या संपत्तीचे अधिकार देणार आहात त्यांना त्या संपत्तीवर वर्तमानात आणि भविष्यात किती टॅक्स भरावा लागेल याचा अंदाज घेऊन मृत्युपत्र लिहावे लागेल. असे केल्यामुळे भविष्यात तुमची संपत्ती ज्याला मिळेल त्याला कमीत कमी टॅक्स भरावा लागेल. त्यासाठी तुम्ही इस्टेट प्लॅनिंगमधील तज्ज्ञ, सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर यांची मदत घेऊ शकता.
५. मृत्युपत्र कशावर लिहावे? :-
मृत्युपत्र साध्या कागदावरही लिहू शकता; ते स्टॅम्प पेपरवर किंवा कायद्याच्या कागदांवर लिहावे लागते असे नाही.
६. मृत्युपत्र टाइप करावे? :-
कायदेशीरदृष्टया मृत्युपत्र हाताने लिहू शकता किंवा ते टाइप करू शकता. परंतु मृत्युपत्र योग्य प्रकारे वाचता यावे वा त्यात फेरफार करता येऊ नये, यासाठी ते टाइप करणे अधिक चांगले ठरते.
७. स्पष्ट भाषा आणि शब्द :-
मृत्युपत्र लिहिण्यासाठी कोणतीही कायदेशीर भाषा वापरण्याची आवश्यकता नसते. मृत्युपत्रात स्पष्ट भाषा आणि शब्द वापरावेत त्यामुळे कोणताही गोंधळ निर्माण न होता मृत्युपत्र करणा-याचा हेतू स्पष्ट होईल.
८. संपूर्ण आणि स्पष्ट विवरण :-
कोणती संपत्ती कोणाला देण्यात यावी आणि कोणत्या स्वरूपात देण्यात यावी, याचे स्पष्ट विवरण मृत्युपत्रात करावे.
९. निष्पादकाची नियुक्ती :-
संपत्तीची वाटणी करण्यासाठी निष्पादकाची नियुक्ती करणे आवश्यक नाही; पण जर संपत्ती खूप असेल आणि वादविवादाची स्थिती उत्पन्न होण्याची शक्यता असेल तर एखाद्या विश्वासू व्यक्तीला निष्पादक म्हणून नियुक्त करावे.
१०. प्रत्येक पानावर सही आवश्यक :-
मृत्युपत्रकर्त्यांने मृत्युपत्राच्या प्रत्येक पानावर सही करणे आवश्यक आहे.
मृत्युपत्रासाठी दोन साक्षीदार आवश्यक असतात. साक्षीदार परिचित व असे असावेत की मृत्युपत्रामुळे त्यांचा कोणताही फायदा होणार नाही.
मृत्युपत्राचे रजिस्ट्रेशन किंवा वा नोटरी करण्याची आवश्यकता नाही. परंतु भविष्यात कोणतेही वाद किंवा गोंधळ होऊ नयेत, यासाठी रजिस्ट्रेशन करणे चांगले. रजिस्ट्रेशनचा एक फायदा असतो तो म्हणजे जर तुमचे मृत्युपत्र हरविले तर तुम्हाला त्याची कॉपी मिळू शकते. मृत्युपत्राचे रजिस्ट्रेशन सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये होते. मृत्युपत्र तुम्ही स्वत:, वकिलामार्फत किंवा सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनरच्या मदतीने करून
घेऊ शकता. परंतु मृत्युपत्र करणे हे महत्त्वाचे आहे.
● मृत्युपत्र व नॉमिनेशन :-
आपल्याजवळ फारशी संपत्ती नाही किंवा जी संपत्ती आहे त्याचे नॉमिनेशन तर दिलेले आहे, अशा भावनेतून अनेक जण मृत्युपत्र बनवित नाहीत. अशा प्रकारे नॉमिनेशन देऊन ते मृत्युपत्राला महत्त्व देत नाहीत. पण नॉमिनीला ही संपत्ती एक ट्रस्टी म्हणून मिळते. नॉमिनेशन दिल्याने मृत्यूनंतर त्याला संपत्तीचा अधिकार मिळत नाही. उलट वारसांनी संपत्ती मागितली तर ती त्यांना सुपूर्द करावी लागते. शेवटी जर तुमची संपत्ती तुमच्या एखाद्या प्रिय माणसाला द्यायची असेल तर फक्त नॉमिनेशन करून काम भागणार नाही; तर त्यासाठी मृत्युपत्र लिहिणे आवश्यक आहे. मृत्युपत्र तयार केल्यामुळे आपल्या मनाप्रमाणे आपली संपत्तीची वाटणी वारसांना देता येते. याखेरीज मृत्युपत्रामुळे वारसांना टॅक्सचे प्लॅनिंगही उत्तम प्रकारे करता येते.
● मृत्युपत्र न लिहण्याचे दुष्परीणाम :-
सर्वसाधारणपणे लोक आपल्या ६० ते ७० व्या वर्षानंतर आपले मृत्युपत्र लिहिण्याचे ठरवतात तर अनेक लोकांचा मृत्यू हा मृत्युपत्र न लिहिताच होतो. एका सर्वेक्षणानुसार भारतात ८० टक्के लोक मृत्युपत्र न लिहिताच मृत्यू पावतात. ज्याचे खालीलप्रमाणे दुष्परिणाम होतात.
मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार संपत्तीची वाटणी होत नाही. संपत्तीची वाटणी इंडियन सक्सेशन अॅक्ट, हिंदू सक्सेशन अॅक्ट, मुस्लीम पर्सनल लॉ या कायद्यानुसार होते. बराच काळ न्यायालयीन प्रक्रिया चालते. न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करीत सक्सेशन सर्टिफिकेट घ्यावे लागते ज्याला सहा महिने किंवा एक वर्षाचा कालावधी लागतो. यासाठी सुमारे ८ ते १० टक्के कोर्टाची फी आणि इतर न्यायालयीन खर्चही करावा लागतो.
● मृत्युपत्राचे प्रोबेट : –
जेव्हा मृत्युपत्रकाराचे मृत्यूनंतर मृत्युपत्रावर संशय निर्माण होऊन काही वाद उद्भवतो, तेव्हा सदर मृत्युपत्राचे सत्यता प्रमाणपत्र (प्रोबेट) संबंधित कोर्टाकडून मिळविता येऊ शकते. शक्यतो मोठ्या मूल्या ंकनाच्या मिळकती, गुंतागुंतीच्या मिळकतीचे बाबतीत असे सत्यता प्रमाणपत्र मिळवावे लागते. प्रोबेट मिळविण्यासाठी कोर्टाकडून जाहीर नोटीस, साक्षीदार, लाभधारक, कार्यपालन, विश्वस्त व डॉक्टरांची तपासणी कोर्टासमोर होत असते. याशिवाय मिळकतींचे मूळ उतारे प्रोबेट अर्जासोबत दाखल करावे लागतात. काही वेळेला सर्व कायदेशीर वारसाची तपासणीही कोर्टासमोर होऊ शकते. मे. कोर्टाचा प्रोबेट आदेश झाल्यावर योग्य ते मूल्यांकनानुसार कोर्ट फी मुद्रांक भरावे लागते. युद्धात आघाडीत असलेले सै निक त्यांचे तोंडी जबाबानुसार मृत्युपत्र करू शकतात. अशा वेळी साक्षीदार सैनिकाचे वतीने मृत्युपत्र सही करू शकतात.
मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार तोंडी मृत्युपत्र पुरेसे ठरते. लेखी असले तरी त्यावर सही पाहिजेच असे नाही. सही असली तरी साक्षीदारांची गरज नाही. मात्र मुस्लिम कायद्याने 1/3 पेक्षा जास्त मालमत्तेचे मृत्युपत्र करता येत नाही.
काही प्रमाणात मृत्युपत्र वाटणी संबधी बराच काळ न्यायालयीन प्रक्रिया चालते. न्यायालयीन प्रक्रायीचे पालन करत सक्सेशन सर्टिफिकेट घ्यावे लागते. ज्याला सहा महिने किंवा एक वर्षचा कालावधी असतो. त्यासाठी सुमारे ८ ते १० टक्के कोर्टाची फी व इतर न्यायालयीन खर्चहि करावा लागतो.
● धार्मिक संस्थांना मिळकती देणे :-
भारतीय वारसा कायदा कलम ११८ ज्या व्यक्तीला स्वतःचा पुतण्या, पुतणी किंवा जवळचा कोणीच नातेवाईक नसल्यास व हे मृत्युपत्र मृत्यूचे एक वर्षापूर्वीचे असल्यास व कार्यपालकाकडे जमा केल्यास, सहा महिन्यांपूर्वी केलेले असल्यास धार्मिक व सार्वजनिक हितार्थ मृत्युपत्राने मिळकती देता येतात व कायदा असे मृत्युपत्र ग्राह्य धरतो. मृत्युपत्र हा कायद्याने पवित्र दस्त’ असतो. त्याचा सर्वांगाने आदर व्हावा हा कायद्याचा उद्देश असतो. मृत्युपत्र हे कायदेशीर टायटल दस्त असल्याने मालमत्तेचा हस्तांतरण कायदा १८८२ कलम ५८ (एफ) नुसार मिळकतीचे ——–इक्कीटेबल गहाण खत करण्याकामी मूळ दस्त ठरतो व तो मूळ दस्त बॅंकांकडे तारण ठेवून कमी खर्च व मुद्रांकात बॅंकेकडे तारण ठेवून कर्ज मिळू शकते.
● हिंदू स्त्रीचे मृत्युपत्र :-
अन्य कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी हिंदू वारसा कायदा कलम 30 मध्ये 2005 मध्ये केंद्र शासनाने केलेल्या दुरुस्तीनुसार हिंदू पुरुषांसारखाच हिंदू स्त्रियांना कुटुंबाचे मालमत्तेत समान हक्क प्राप्त झाल्याने त्यांना त्यांची संपत्ती पूर्ण स्वामित्वाचा असल्याने मृत्युपत्राद्वारे हस्तांतरित करण्याचा पूर्णाधिकार असतो. मृत्युपत्र म्हणजे मृत्युपत्रकाराने स्वतःच्या संपत्तीविषयीचे उद्दिष्ट मृत्युपत्रात नमूद करून ते मृत्यून ंतर अमलात यावे अशी त्याची इच्छा असते.
● मृत्युपत्रात प्रामुख्याने तीन भाग येतात.
☆ जो मृत्युपत्र करतो त्याचा हेतू कायदेविषयक जाहीर ठरावाचा असावा.
☆ त्याचा जाहीर ठराव करण्याचा हेतू त्याच्या मिळकतीसंबंधी असावा.
☆ त्याने त्या लेखाद्वारे त्या मिळकतीची व्यवस्था होईल असे पाहावे.
● कार्यपालन विश्वस्तांची नेमणूक :-
मृत्युपत्राचा उद्देश हा मृत्युपत्राचे इच्छेचे पालन व्हावे असा असल्याने सदर इच्छेचे पालन होणे कामी कार्यपालन विश्वस्तांची नेमणूक मृत्युपत्रकाराने मृत्युपत्रातच करून ठेवल्यास योग्य ठरते. कारण असे कार्यपालन विश्वस्त हे मृत्युपत्रकाराचे विश्वासातील असल्याने ज्यांचे लाभात मृत्युपत्र केलेले आहे, त्यांनाच त्या मिळकती मृत्युपत्रकाराचे मृत्यूनंतर मिळाव्यात म्हणून सदर कार्यपालन विश्वस्त कार्यव्यवस्था करू शकतात. असे कार्यपालन विश्वस्त हे कोणीही एक किंवा अनेक व्यक्ती असू शकतात. ते लाभधारकांपैकीही असू शकतात.
हिंदू कायद्यानुसार मृत्युपत्र हे लेखी असणे आवश्यक असते. मात्र त्याला कोणत्याही मुद्रांकाची आवश्यकता नसते. तरीही मृत्युपत्र शाबीत होणे सोपे जावे, विशेषतः तारखेसंबंधी घोळ राहू नये म्हणून रु. १०० चे मुद्रांकावर मृत्युपत्र असणे योग्य ठरते. मृत्युपत्राची नोंदणी करणे बंधनकारक नाही. मात्र नोंदणी केल्यास रु. १०० चे नोंदणी शुल्क लागते. मृत्युपत्राचा दस्त नोंदविणे किंवा मृत्युपत्राचे आधारे नेमणुका करणे वा मृत्युपत्र रद्द करणे यासाठी रु. १०० चे नोंदणी शुल्क लागते. मृत्युपत्रास नोंदणी करण्याची आवश्यकता नसते. तरीसुद्धा मृत्यूनंतर पुराव्याचे बाबतीत काही वाद उद्भवू नयेत म्हणून मृत्युपत्राची नोंदणी करणे योग्य ठरते.
● मृत्युपत्राच्या काही कायदेशीर बाबी :-
१. कायदा असे मृत्युपत्र ग्राह्य धरतो.
२. मृत्युपत्र हा कायद्याने पवित्र दस्त’ असतो.
३. त्याचा सर्वांगाने आदर व्हावा हा कायद्याचा उद्देश असतो.
४. मृत्युपत्र हे कायदेशीर टायटल दस्त असल्याने मालमत्तेचा हस्तांतरण कायदा १८८२ कलम ५८ (एफ) नुसार मिळकतीचे इक्विटेबल गहाण खत करण्याकामी मूळ दस्त ठरतो व तो मूळ दस्त बॅंकांकडे तारण ठेवून कमी खर्च व मुद्रांकात बॅंकेकडे तारण ठेवून कर्ज मिळू शकते.
५. मृत्युपत्राचे तरतुदीनुसार मृत्युपत्रकाराचा मृत्यूचा दाखला मिळवून ७/१२ वा मालमत्ता पत्रकावर लाभधारकाचे नावे मृत्यूनंतर तीन महिन्यांत योग्य अर्जाद्वारे नोंदवावे.
● मृत्युपत्राद्वारे स्व मिळकतीची विल्हेवाट :-
१. मृत्युपत्र हे कायदेशीर वारसांचे लाभात करणे बंधनकारक नसते.
२. सदर मिळकती या स्वतःच्या असल्याने किंवा स्वतःच्या हिश्श्याच्या असल्याने त्याची विल्हेवाट करण्याचा अधिकार पूर्णत्वाने असतो.
३. त्यामुळे तो कुणाचेही लाभात असे मृत्युपत्र करू शकतो. मग तो सज्ञान वा अज्ञान कोणीही चालतो
४. मृत्युपत्र त्रयस्थ इसमाचे लाभात करण्यास कायद्याचा कोणताही अडसर नाही