प्रकल्प व पुनर्वसन
प्रकल्प व पुनर्वसन
प्रकल्प व पुनर्वसन
◆ सौम्य ते मध्यम रंगांधळेपण असलेल्या नागरिकांना सुद्धा मिळणार वाहतूक परवाना ◆
भूसंपादन बोपखेल मिलीटरी जमीन
ग्राम पंचायत निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती
1. जात प्रमाणपत्राची पडताळणी आणि वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन मिळेल
2. जात पडताळणीचा अर्ज एक खिडकी योजनेतून मिळेल
3. जातपडताळणी समितीला द्यावयाचा अर्ज तहसीलमध्ये मिळेल
4. निवडणूक जिंकल्यानंतर वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रस्तावाची पोचपावती, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती 12 महिन्यांत द्यावी लागेल
5. उमेदवाराला एका प्रभागातून एकच उमेदवारी अर्ज भरता येणार
6. अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर हमीपत्र आणि घोषणापत्र निवडणूक अधिकाऱ्याला द्यावे
7. खर्च हिशेब देताना हमीपत्र, अपत्यांचे प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, डिपॉझिटची पावती द्यावी लागेल
8. 190 मुक्त चिन्हांपैकी उमेदवाराला 5 निवडणूक चिन्हे निवडता येणार
9. एका प्रभागात एका उमेदवाराचे चिन्ह दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही
10. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल
11. 7 आणि 9 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 25 हजार रुपये
12. 11 आणि 13 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 35 हजार रुपये
13. 15 आणि 17 सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा 50 हजार रुपये
14. खुल्या प्रवर्ग उमेदवारांसाठी 500 रुपये डिपॉझिट
15. SC-ST, OBC उमेदवारांसाठी 100 रुपये डिपॉझिट (Gram Panchayat Election Candidate Form Filling Begins)
उमेदवारी अर्ज भरताना काय काय हवे ?
1. उमेदवाराने वयाची 21 वर्षे पूर्ण केली असल्याचा जन्मतारखेचा पुरावा
2. अंतिम मतदार यादीत नाव असलेला उतारा
1. उमेदवाराने वयाची 21 वर्षे पूर्ण केली असल्याचा जन्मतारखेचा पुरावा
2. अंतिम मतदार यादीत नाव असलेला उतारा
3. उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अपात्र ठरवलेले नसावे
4. अपत्य किती आहेत याचे प्रमाणपत्र
5. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र
6. मालमत्ता आणि दायित्वाचे प्रमाणपत्र
7. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसल्याचे, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र
8. घरी शौचालय असून वापर करत असल्याचे हमीपत्र
9. राखीव जागांवरील उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र वा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा पुरावा
10. डिपॉझिटची रक्कम भरल्याचा पुरावा
11. महिला उमेदवारांनी माहेरचे जातप्रमाणपत्र असल्यास 100 रुपयांच्या बाँडवर शपथपत्र
12. टीसी किंवा सनद आदी शैक्षणिक पुरावे
13. आधार आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र
14. ग्रामसेवकांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र
2020-21 च्या निवडणुकीत कोणते दोन बदल ?
1. सरपंच-उपसरपंचाचे आरक्षण निकालानंतर होणार. 14 फेब्रुवारीच्या आत आरक्षण निश्चिती
2. राखीव जागांवरील उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोचपावती वा अर्ज केल्याचा पुरावा पुरेसा
जमीन इनाम सनद
जुने घर फ्लॅट खरेदी-विक्री करतांना स्टॅम्पड्युटीची गरज नाही मुंबई हायकोर्टाचा आदेश | No Stamp duty |
जुने घर फ्लॅट खरेदी-विक्री करतांना स्टॅम्पड्युटी ची गरज पडणार नाही मुंबई हायकोर्टाचा आदेश.
No Stamp duty on old Home Flat buying.
आता जुने घर फ्लॅट घेताना ड्युटी ची गरज पडणार नाही मुंबई हायकोर्टाचा १३ डिसेंबर २०१८ रोजी आदेश दिले आहेत त्यामुळे सर्व सामान्य माणसाला जुने घर खरेदी-विक्री करतांना स्टॅम्प ड्युटी भरण्यापासून सुटका झाली आहे. याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडीओ मध्ये केला आहे.
मुंबई हायकोर्टाचा निर्णय लिंक-
https://drive.google.com/file/d/19xnI1hWp0BmWYmnk-6t6Xp6LUXurf5m8/view
क ड ई पत्र
खरेदी खत
मालमत्तेचा हस्तांतर कायदा १८८२ कलम ५४ ते ५७ नुसार खरेदी म्हणजे मालमत्तेचे मालकी हक्काचे हस्तांतर म्हनजे अदा केलेल्या पुर्ण किमतीच्या बदल्यात किंवा अंशत: अदा केलेल्या किमतीच्या बदल्यात किंवा भविष्यात मोबदला देण्याच्या कबुलीवर नोंदणीकृत केलेला व्यवहार होय. याचाच अर्थ ठरलेला मोबदला पुर्ण किंवा अंशत: खरेदीपुर्वी, खरेदीच्या वेळी किंव खरेदी नंतर दिला तरी चालु शकतो.
खरेदीखत करताना साठेखतात/करारनाम्यात ठरलेल्या सर्व अटि किंवा शर्ती पुर्ण झाल्यास किंव कसे, हे बघणे खालील गोश्ती आवश्यक आहेत.
खरेदीखत विसार पावती, करारनामा यात नमुद केलेल्या अटी व शर्तीचा उल्लेख असणे आवश्यक असते. यात लिहुन देणार व घेणार यांचा नाव, वय, व्य्वसय, पत्ता, पॅन नंबर आवश्यक आसतो. याशिवाय मालमत्तेचे तपशीलवार वर्णन, पुर्वी झालेल्या मालमत्ता हस्तांतराचा तपशील व ताबा वेगवेगळ्या मंजुरी व परवाअनग्यांचा तपशील, ओनरशिप फ्लॅट कायद्यातील तरतुदीनुसार सोसायटी किंवा अपार्टमेंट झाले असल्यास त्याचा व सभासदत्वाचा तपशील, मालमत्ता विकण्याचे कारण, मोबदला तपशील व अदा करण्याची पद्धत, वेळ, ताब्याचा तपशील, निर्वेध टायटलबद्दल हमी, कर भरल्याचा तपशील, साक्षीदर, मालमत्ता विकण्याच्या आनी घेण्याच्या हेतुने केलेल्या सह्या, वगैरे तपशील असावा लागतो. विक्री करणा-यास हि मिळकत विकण्याचा हक्क व त्याचा तपशील असावा लागतो. विक्री क्रणा-यास सदर मिळकत विकण्याचा हक्क व त्याचा तपशील, देणर-घेणार यांचे पॅन नंबर गरजेचे असतात.
साठेखत
मलमत्तेचा हस्तांतर कयदा सांगतो, की मिळकतीचे साठेखत/करारनामा म्हणजे मिळकतीचे हस्तांतर नाही, तर मलमत्ता घेणार/विकणार यांच्यामधेय ठरलेल्या अटी व शर्तीनुसार ठरविलेल्या कालावधीत कागदपत्रांची पुर्तता कर्य व शेवटी मालमत्तेचे हस्तांतर नोंदणीकृत खरेदीखताने करु, असा तपशील असतो.
http://mangesh-technoholik.blogspot.com/2013/04/blog-post.html
ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भातील महत्त्वाचे आदेश व सूचना
अर्ज डाऊनलोड करा – मतदार यादी
| प्रचारसभेच्या 82 मैदानासाठी महापालिकेने केले शुल्क निश्चित |
|
|
• तीन दिवस आधी करावे लागणार आरक्षण नांदेड, दि.19: नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने प्रचार सभेसाठी लागणा-या विविध 82 मैदानांचे प्रत्येकी सहा तासांचे भाडेवजा शुल्क निश्चित केले आहेत. इच्छुक पक्ष किंवा उमेदवार यांना मैदानाचे आरक्षण करण्यासाठी किमान तीन दिवस अगोदर अर्ज करणे आवश्यक असून आयत्या वेळी परवानगी मागणा-यांना एकत्रित शुल्काशिवाय अतिरिक्त स्वरुपात पाच हजार रुपये भरावे लागणार आहेत. इंदिरा गांधी मैदान किंवा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा येथील मोकळ्या भूखंडासाठी प्रत्येक सहा तासासाठी 25 हजार रुपये एकत्रित शुल्क आकारले जाईल. जुना मोंढा टॉवर किंवा सिडकोतील गुरुवार बाजार आठवडी मैदानाच्या आरक्षणासाठी 15 हजार तर याव्यतिरिक्त महापालिकेने प्रपत्र अ मध्ये निविदिष्ट केलेल्या इतर 78 मोकळ्या जागेत प्रचारसभा घेण्यासाठी 10 हजार रुपये एका वेळेचे सहा तासासाठी एकत्रित शुल्क आकारले जाईल. उमेदवार किंवा त्यांच्या पक्षाला एका दिवशी शक्यतो एकच मैदान आरक्षित करता येईल. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर मैदान प्रचारसभेसाठी उपलब्ध करुन जाईल. एकाच वेळी एकापेक्षा अधिक संयोजकांचे आरक्षण अर्ज प्राप्त झाल्यास त्यांच्या समक्ष सोडत काढून मैदानाचे आरक्षण केले जाईल. कोणत्याही मैदानाचे दोन, एक दिवसाआधी किंवा आयत्या वेळी (प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य) आरक्षण करणा-यांना तात्काळ शुल्क म्हणून पाच हजार रुपये अतिरिक्त रक्कम भरावी लागेल. जागेच्या एकत्रित शुल्कात साफ़सफ़ाई शुल्क, सभेच्या वेळेत बॅनर व झेंड्यांची परवानगी शुल्क, पुन:स्थापित शुल्क, तपासणी शुल्क, जागा क्षतिपुर्ती शुल्क, डागडूजी, दुर्गंधी निर्मुलन आदी शुल्कांचा समावेश आहे. एकदा केलेले आरक्षण रद्द केले जाणार नाही किंवा बदलून दिले जाणार नाही. तसेच कोणत्याही परिस्थितीत शुल्क परत मिळणार नाही किंवा इतरत्र वळते करुन दिले जाणार नाही. सर्व संबधितांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्षजळगाव (प्रतिनिधी) विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता विविध राजकीय पक्षांना/उमेदवारांना प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या/परवाने घ्यावे लागतात. या परवानग्या संबंधितांना तात्काळ उपलब्ध व्हाव्यात. यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. निवडणूकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांना/उमेदवरांना परवानग्या/परवाने प्राप्त करुन घेण्यासाठी वेगवेगळया कार्यालयाकडे जावे लागते. यासाठी लागणारा वेळ कमी व्हावा आणि सदरील परवानग्या/परवाने तात्काळ प्राप्त व्हावे. याकरीता एक खिडकी योजना कार्यान्वित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यानुसार प्रचारासाठी विविध परवाने देणेसाठी जिल्हा निवडणुक अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. एक खिडकी कक्षामध्ये परवानग्या/परवाने देणारे अधिकारी व परवानगीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत चौकसभा व सर्व प्रकारच्या जाहिरसभा घेणेकरीता संबधीत कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलिस अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असून याकरीता परवानगी मिळणेबाबतचा अर्ज, जागा मालकाचे संमतीपत्र, ग्रामपंचायत/नगरपालिका/ महापालिकेचा नाहरकत दाखला असणे आवश्यक आहे. सभेच्या ठिकाणी पोस्टर्स/झेंडे लावणे याकरीता उपआयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी नगर परिषद/ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांची परवानगी घेणे आवश्यक असून याकरीता अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र, नगरपालिका/ महापालिकेचा/ग्रामसेवकाचा नाहरकत दाखला. खाजगी जागेवर जाहिरात फलक (कटआऊट वगळून) लावणे याकरीता उपआयुक्त महानगरपालिका/ मुख्याधिकारी नगर परिषद/ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांची परवानगी घेणे आवश्यक असून अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र, फलक लावल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. प्रचार वाहन परवानगी एक पेक्षा जास्त विधानसभा मतदार संघ कार्यक्षेत्राकरीता परवानगी पाहिजे असल्यास त्या मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी/अपर जिल्हादंडाधिकारी/निवासी उप जिल्हाधिकारी, जळगाव यांची तर फक्त विधानसभा मतदार संघ कार्यक्षेत्रासाठी संबधित निवडणूक निर्णय अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असून अर्ज, वाहनमालकाचे संमतीपत्र, वाहन नोंदणीपत्र, वाहन विम्याचे वैध प्रमाणपत्र, वाहनाचे वैध वायु प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र, वाहन चालकाचा वैध परवाना आवश्यक आहे. प्रचार कार्यालयांची परवानगी घेणेकरीता संबंधीत कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलिस अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असून अर्ज, खाजगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र, नगरपालिका/ महानगरपालिका / ग्रामसेवकाचा नाहरकत दाखला आवश्यक आहे. हेलीपॅडवर हेलिकॉप्टर उतरविणेकरीता संचालक, नागरी विमान सेवा यांची परवानगी आवश्यक असून अर्ज, जिल्हाधिकारी /पोलिस अधिक्षक/कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे नाहरकत प्रमाणपत्र, नगरपालिकेचा/ महापालिकेचा नाहरकत दाखला आवश्यक आहे. ध्वनीक्षेपकाची परवानगी करीता संबंधीत कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलीस अधिकारी यांची परवानगी आवश्यक असून अर्ज, वाहन चालकाचा वैध परवाना आवश्क आहे. मिरवणुक/रोड शो/रॅली करीता संबंधीत कार्यक्षेत्राचे प्रभारी पोलिस अधिकारी यांची परवानगी आवश्यक असून अर्ज, मिरवणुक/ रोड शो/ रॅलीचे ठिकाण नमुद करणे आवश्यक आहे. केबल जाहिरात परवानगी करीता जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी आवश्यक असून नमुना अ मध्ये अर्ज, जाहिरात मजकुर स्वरुपात अथवा ध्वनी मुद्रीत/रेकॉडींग सी डी स्वरुपात असणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर परवानगी देणेसाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी परवानगी देण्याची कार्यवाही करावी, असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. ढाकणे यांनी आदेशात म्हटले आहे. याप्रकारचे परवाने मिळण्यासाठी उमेदवार/राजकीय पक्ष यांनी त्यांचे अर्ज सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वा वेळेत स्वीकारले जातील. उमेदवार अथवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी वरील सक्षम अधिका-यांकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर त्यांना तात्काळ परवानगी दिली जाईल. उमेदवार व राजकीय पक्ष यांना ग्रामपंचायत/नगरपरिषद यांचे नाहरकत प्रमाणपत्र त्याचठिकाणी उपलब्ध होण्याकरीता संबंधीत पंचायत समितीचा एक विस्तार अधिकारी आणि नगरपालिकेचा जबाबदार प्रतिनिधी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दररोज सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत उपलब्ध राहून याचठिकाणी नाहरकत प्रमाणपत्र उमेदवार/त्यांचा निवडणूक प्रतिनिधी यांना उपलब्ध करुन देणार आहे. त्याचबरोबर जळगाव शहर महानगरपालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एक जबाबदार अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करण्याकरीता व वायु प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याकरीता एक जबाबदार अधिकारी, तर पोलिस अधिक्षक, जळगाव यांचे अधिनस्त एक पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी जळगाव शहरातील परवान्यांसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव येथील एक खिडकी कक्षात प्रतिनियुक्ती करण्याचे निर्देशही डॉ. ढाकणे यांनी संबंधितांना दिले आहेत. हे सर्व अधिकारी सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उमेदवार/त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांना जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयातच संबंधीत परवाने देणार आहेत. त्याचबरोबर सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातही याप्रमाणे एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याचे डाॅ. ढाकणे यांनी आदेशात म्हटले आहे. https://panchayatelection.maharashtra.gov.in/ नामनिर्देशनपत्र / शपथपत्र /पक्षाचे जोडपत्र भरण्या करिता सूचना१) ज्या प्रभागातून निवडणूक लढवावयाची आहे त्या प्रभागाचा क्रमांक व जागा क्रमांक स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
|
Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection