जमीन हडपसर Glyading Centre pune
जमीन हडपसर Glyading Centre pune
1999 ते 2002 या कालखंडात तत्कालीन पुणे शहराचे महाद्वार समजल्या जाणाऱ्या प्रचंड Busy असलेल्या हडपसर गाडीतळ पोलीस चौकी येथे सहायक पोलीस निरीक्षक या पदावर काम करण्याची संधी प्राप्त झाली
तो कालखंड कायम स्मृतीत राहील
तेथे कार्य करीत असताना जर कोणी सांगितले असते की “हडपसर Glyding Centre “या बद्दल महत्वाची महसुली माहिती मी FB द्वारे प्रसिध्द करेन ” तर ते 100% मला पटले नसते
पण काळा ने ते सिद्ध करुन दाखवले
“बळीराजा महाराष्ट्र जमीन संहिता “या प्रबोधन ग्रंथा तील प्रकरण क्र 27 )भूसंपादन व मूल्यांकन याअंतर्गत 27(1) पुणे जिल्ह्यातील महत्वाची भूसंपादने या अंतर्गत वर नमूद संपादन संदर्भाने संक्षिप्त माहिती नमूद आहे
ती खालील प्रमाणे
Land Acquisition Case no 3 of 1955/56
Glyading centre हडपसर pune
भूसंपादन कायदा कलम 4 नुसार नोटीस No LPO -10-55 / 114310/ dt 10/10/1955 Published in Bombay Government Gazette part 1 Dt 20/10/1955 page no 4997 to 4998 यावर
प्रसिद्ध करण्यात आली
भूसंपादन कायदा कलम 6 नुसार नोटीस No 2 po 10-55/ 114310 Dt 1/11/1955 Published In Bombay Government Gazette part 1 Dt 10/11/1955 page no 5255 यावर प्रसिध्द करण्यात आली
वर नमूद नोटिफिकेशन नुसार
Hadpasar Glyding Centre या साठी हडपसर सर्वे न 6 part,7,20,21 A, 22,23,24,31,32,33 यातील जमीन 213 एकर 10 गुंठे इतकी संपादित करण्यात आली आहे
सदर glyding च्या चतु:सीमा
North- सासवड रोड
south- सर्वे न 36
east – फुरसुंगी Boundary
west- cart track to Urali
हडपसर सर्वे न 9 येथे पुणे मनपा Octroy नाका होता सदर Glyding centre साठी सदर सर्वे न मधील जमीन 1 एकर 1गुंठे 9 आणे ही दि 3/4/1951 रोजी भूसंपादन करण्यात आली
सदर नाका पुणे सोलापूर रोड पासून 266 फूट अंतरावर होता
सदर भूसंपादन अवॉर्ड मध्ये नमूद केले नुसार हडपसर सर्वे न 221,222,223 यातील जमीन आकाशवाणी केंद्र यासाठी संपादीत करण्यात आली आहे
सदर संपादन वेळेस एकरी दर रु 1000 असा होता
उपरोक्त नमूद glyding centre साठीची जमीनीचा ताबा भूसंपादन Urgency Clause नुसार दि 8/5/1956 रोजी घेण्यात आला
-रमाकांत माने
