सरसुभे वटहुकूम कोल्हापूर संस्थान
सरसुभे वटहुकूम
कोल्हापूर संस्थान
या सोबत सरसुभे वटहुकूम कॉपी
“बळीराजा महाराष्ट्र जमीन संहिता ” या प्रबोधन ग्रंथात प्रकरण क्र 25 या मध्ये सर सुभे वटहुकूम कोल्हापूर संस्थान या बाबत तसेच कोल्हापूर संस्थान येथील न्यायदान पद्धती व इतर बाबत माहिती नमूद आहे
सदर प्रकरणातील संक्षिप्त मजकूर खालील प्रमाणे –
…1)कोल्हापूर संस्थान स्थापना इ स सन1710 मध्ये झाली
कोल्हापूर संस्थान मध्ये इ स 1844 पासून ब्रिटिश अंमल सुरु झाला
2)प्रशासन कारभार व न्यायदान यातील समस्या निर्माण करताना पोलिटिकल एजंट ,स्टेट कारभारी वैगेरे अधिकारी वेळोवेळी circular, जाहीरनामे, वटहुकूम निर्गमित करण्यात येत असे
3)वट हुकूम काढण्याची पद्धत इस 1843 साली सुरु झाली व ती इस 1949 पर्यन्त सुरु राहिली
इस 1867 साली कोल्हापूर जिल्हा न्यायालय स्थापन झाले
सदर न्यायालयाचे पहिले न्यायाधीश श्री महादेव गोविंद रानडे (सप्टेंबर 1867 ते मार्च 1868 ) होते
मराठा इतिहासावर नवा प्रकाश पाडणारे” Rise of the Maratha Power ” हे पुस्तक त्यांनी सन 1900 मध्ये प्रसिद्ध केले
दि 26.11.1893 ते दि 16.1.1901 या कालखंडात ते पुणे व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते वयाचे 25 वे वर्षी ते कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश बनले
4)न्यायमूर्ती बळवंत नारायण जोशी
हे कोल्हापूर जिल्हा न्यायाधीश या पदावर सन 1882 ते सन 1898 असे 16 वर्षे कार्यरत होते
बाणेदार, नि:स्पृह, निःपक्षपाती ,न्याय देणारे अशी त्यांची प्रतिमा होती
5)ना भास्करराव विठोजीराव जाधव
मराठा समाजात जे विद्वान व्यासंगी तळमळीचे नेते निर्माण झाले त्या मधील अग्रगण्य नाव
सन 1897 साली District Magistrate Session Judge म्हणून दिवाणी कामातील अपिलेट बेंच जज म्हणून कोल्हापूर न्याय खात्यात प्रवेश
त्यांची कामगिरी पाहून त्यांची नेमणूक कोल्हापूर supreme court येथे झाली होती
तत्कालीन सहकारी चळवळीचे आद्य प्रणेते म्हणून त्यांची ओळख आहे
….
उपरोक्त क्र 2 ते 5 यातील माहिती “कोल्हापूर जिल्हा शत सांवत्सरिक महोत्सव स्मरणीका ” यात नमूद आहे
-रमाकांत माने
