दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार, राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच इतर सर्व संस्थांमधील विविध पदभरतीसाठी दिव्यांग उमेदवारांसाठी वैश्विक ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे, याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने निर्गमित केला आहे.
विविध शासकीय, निमशासकीय व इतर सर्व प्राधिकरणे, संस्था इत्यादीमध्ये पदभरतीसाठी अर्ज घेताना दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित असलेल्या जागांसाठी संबंधित दिव्यांग व्यक्तींच्या वैश्विक ओळखपत्राचा क्रमांक नोंदविणे तसेच प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. सर्व मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व आस्थापना, विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख तसेच स्वायत्त संस्था यांना त्यांच्या आस्थापनेवर दिव्यांग आरक्षणांतर्गत सेवेत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



