घर नं 369 च्या फेरफार सबंधी
धनंजय मनोहर राणे / किरण मनोहर राणे
रामदूत 2 । 207। 3 रा मजला करी रोड मुंबई। 400012
फोन-9029944937 / 24719750
मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद् रत्नागिरी.
तक्रार अर्ज- घर नं 369 च्या फेरफार सबंधी कै.धोंडू भिकाजी राणे यांचे असेसमेंटचे नाव बदलुन कै.रामचंद्र भिकाजी राणे याचे पुत्र दत्ताराम रामचंद्र राणे वय 85 यांनी 1967 ते 1980 च्या दरम्यान कोणतेही पुरावे न देता परस्पर असेसमेंट चे नाव बदल केले व ग्रामपंचायत आणि धोंडू भीकाजी राणे यांच्या वारसांची रितसर फसवनुक केली यातून आम्ह़ाला आमचे रितसर सगळे कागदपत्रे तपासून मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद् रत्नागिरी यांच्या पत्रा प्रमाने घर कै.धोंडू भीकाजी राणे यांच्या वारसांच्या नावे करण्यात यावे. ( ग्रामपंचायत जिल्हा परिषद् रत्नागिरी जा क्र रजि प /सा प्र वि/ ग्राप / कार्य-3/2232/2016 दिनांक-23/06/2016 दिलेल्या पत्रा प्रमाने व् आपले सरकार वर तक्रार नोंद केल्यावर दिनांक 01/08/2016 रोजी पंचायत समिती राजापुर कार्यालयात चौकशी झाली व अहवाल पंचायत समितीने कलेक्टर ऑफिसला व् जिल्हापरिषदेला पाठविला ) पण 1 महिना होऊनही अजूनही न्याय मिळाला नाही.
माननीय सरपंच ग्रामपंचायत धाऊलवलल्लि याच्या नोटिसा प्रमाने 11-03-2016 रोजी सकाळी 10 वाजता व 19-03-2016 रोजी दुपारी 12 वाजता मी हजर होतो.तुम्ही दिलेल्या नोटिसा प्रमाने जा क्र ग्रा पं धा/196/2016 पत्रा प्रमाने 1967 ते 1980 च्या कालात घर क्र 369 च्या फेरफारा सबंधी दत्ताराम रामचंद्र राणे याचे पुत्र उदय दत्ताराम राणे कोणतेही पुरावे सादर करू शकले नाहीत प्रकरण पुढे गेल्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद् रत्नागिरी जा क्र रजि प /सा प्र वि/ ग्राप / कार्य-3/2232/2016 दिनांक-23/06/2016 दिलेल्या पत्रा प्रमाने व् आपले सरकार वर तक्रार नोंद केल्यावर दिनांक 01/08/2016 रोजी पंचायत समिती राजापुर कार्यालयात चौकशी करीता बोलावले होते या चौकशी कामी पंचायत समिती विस्तार अधिकारी काबंळी धाऊलवल्ली सरपंच शिगवन मैडम व् ग्रामसेविका तळवडेकर मैडम उपस्थित होते. चौकशी पूर्ण करून 1 महिना झाला.आता कायद्याच्या तरतूदी प्रमाणे आम्ही आमचे वारस कागदपत्र पंचायत समिती व् ग्रामपंचायत यानां सादर केलेले आहेत.आपण आमचे सर्व पुरावे आणि कागदपत्र तपासून हे घर आमच्या ( धोंडू भिकाजी राणे )यांच्या वारसांच्या नावे करण्यात यावे अशी विनंती.
आता कायद्द्याचा आधार आमच्या संरक्षणाची ढाल बनवून मी व् माजे कुटुम्बिय गावाला येऊन जो आमचा वारसा हक्का प्रमाने ग्राम् पंचायतिस अपील करीत आहे की असेसमेंट रजिस्ट्रर वर योग्य तो फेरफार करावा व् वारसाची नावे असेसमेंट वर चडविन्यात यावी.
तो तरी ग्रामपंचायतिने 369 घराचा ताबा लवकरात लवकर वारसाच्या नावे दयावा.
मार्च 2016 पासून आता पर्यंत 7 महीने वारस अर्ज देऊनही ग्रामपंचायत दखल घेत नाही.
आपला कृपाभिलाशी.
धनंजय मनोहर राणे / किरण मनोहर राणे
9029944937
24719750
प्रति
गटविकास अधिकारी पंचायत समीति राजापुर.
तलाठी कार्यालय.
ग्रामपंचायत धाऊलवली.राजापुर
माननीय सरपंच
