मदत हवी आहे !!
झकास December 5, 2007 – 2:52 pm
भारतात (पुण्यात) घर (फ्लॅट) भाड्याने देताना कोणती काळजी घ्यावी लागेल ?
माझ्या माहितीप्रमाणे
घरमालक आणि भाडेकरू ह्यांच्यात एक करार करावा. ह्यात खालील गोष्टी अंतर्भूत आहेत-
१. दोन्ही व्यक्तिंचा पत्ता.
२. भाड्याने द्यावयाच्या जागेचा पत्ता.
३. डिपॉझिट व भाड्याची रक्कम
४. घरातील फर्निचर, दिवे, पंखे, ई. गोष्टींचा उल्लेख
५. घर मुदतीपूर्वी रिकामे करायचे झाल्यास दोघांना द्यावी लागणारी आगाऊ सूचना
६. सोसायटीचा देखभाल खर्च, पालिकेचा टॅक्स, पाणी/विज बिल कोणी भरायचे ह्याचा स्पष्ट उल्लेख
हा करार शक्यतो ११ महिन्यासाठी करतात. (ह्यामागे कराराचे रजिस्ट्रेशन टाळण्याचे कारण असावे का?)
ह्याचबरोबर असेही ऐकिवात आहे की भाडेकरूची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यालाही द्यावी.
आता काही प्रश्न –
१. दोन्ही व्यक्तिंमध्ये होणार्या भाडेकरारपत्राचे रजिस्ट्रेशन करावे का? असे करणे कायद्याने बंधनकारक आहे का? दोन्ही व्यक्तिंमध्ये काही विवाद झाल्यास – भाडेकरूने घर मुदतीनंतरही रिकामे न करणे, घरमालकाने डिपॉझिटची रक्कम परत न देणे, वगैरे. – असे रजिस्ट्रेशन असलेले जास्त बरे पडेल काय?
२. एक वर्षापेक्षा जास्त मुदतीसाठीच रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे का? ते कुठे करावे लागते?
३. पोलिस ठाण्यामध्ये भाडेकरूची कोणती कोणती माहिती द्यावी लागते?
४. भाड्याच्या उत्पन्नावर आयकराबद्दल काय सांगता येइल?
५. अजून काय काय काळजी घ्यावी ?
