Soil Grant इनाम
“बळीराजा महाराष्ट्र जमीन संहिता “या प्रबोधन ग्रंथातील प्रकरण क्र 26 ) पुणे पुराभिलेख येथील महसुली कागदपत्रांचे न्यायालयीन महत्त्व या अंतर्गत Soil grant इनाम सनद या बाबत माहिती या सोबतचा दि 26 फेब्रुवारी 1918 चा शासन निर्णया बद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे नमूद केली आहे
Soil Grant इनाम
ज्या इनाम सनदेत “कुल बाब कुल कानू, जल ,तरु ,तृण, पाषाण,निधी निक्षेप सहित पेस्तर पटी झाडा झडोरा “हे शब्द नमूद असतात त्या इनाम सनदा soil grant इनाम समजल्या जातात
संदर्भ
Govt of Bombay Revenue Department Order No 1934, Bombay Castle Dt 26/2/1918
हेरे सरंजाम ता चंदगड जि कोल्हापूर हे 1937 साली Soil grant ठरवण्यात आले
सदर इनामात एकूण 47 गावातील 22092 हेक्टर जमीनीचा समावेश आहे
शासन निर्णय महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र SRP 3993 /990/ प्र क्र 140/ ल 4 दि 31/5/2001 नुसार सदर सरंजाम जमीन निर्गती बाबत आदेश निर्गमित झाला
लोकमत news 25 डिसेंबर 2019
31 मे 2001 चे शासन निर्णया नुसार खालील नमूद गावातील व्यक्तींना सदर निर्णयाचा लाभ जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे पुढील कार्यवाहीमुळे झाला
ता चंदगड येथील गावे
हेरे ,कानूर खुर्द, पुद्रा, सडे गुळवले, कानूर बुद्रुक, धामापूर, कुरणी,बिजूर, बुझवडे, म्हाळुंगे, इब्राहिमपूर, गवसे कानडी, अळबा देवी, सतेवाडी, पोवाची वाडी, मौजे शिरगाव, मजरे शिरगाव, सावर्डे, नागण वाडी, कुर्टवाडी ,गंधर्वगड, दाटे, बेले भाट, वर गाव, गुडे वाडी, तांबूळ वाडी, बागीलगे, सातवणे, आसगोळी, केंचेवाडी, केरवडे, वाळकुंद्री, आमरोळी, मुगळी, गणूची वाडी, सोनार वाडी, जोगेवाडी, अडकूर, बोजर्डी मोरेवाडी ,मळगे वाडी, विंझने, लाधुरवाडी, मोटण वाडी,शिवणगे
-रमाकांत माने
