शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमित करणे
जिल्हाधिका-याने आलेल्या अर्जाची छाननी करून जमीन प्रदान करण्यास पात्र असलेल्या अर्जांचाच फक्त विचार करावा. उच्च प्राथम्यक्रम मिळणा-या व्यक्तींचे अर्ज संपल्याखेरीज निम्न प्राथम्यक्रम मिळणा-या व्यक्तींच्या अर्जांचा विचार केला जात नसल्याची खात्री नसल्याची खात्री करून घ्यावी. हे साध्य करण्याच्या दृष्टीने, जिल्हाधिका-याने पात्र व्यक्तींकडून आलेले अर्ज केवळ प्राथम्यक्रमानुसार लावल्यानंतरच जमीन निकालात काढण्याचे काम हाती घ्यावे.
शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमित करणे :-
१. आवश्यक कागदपत्रे :-
१. अर्जदार यांचा नियमित करणे बाबतचा अर्ज
२. प्रश्नधीन मिळकतीचा ७/१२ उतारा
३. अतिक्रमण असलेपासून पिकपाहणी उतारे.
४. अतिक्रमण नोंदवही मधील गाव नमुना १-ई चा उतारा
५. मंडल अधिकारी यांचा स्थळ निरीक्षण पंचनामा
६. शासन निर्णय दिनांक ०४ एप्रिल २००२ अन्वये अतिक्रमण नियमित करणेकामी येणारी दंडाची रक्कम सरकार जमा करणेस तयार असलेबाबत अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र.
७. अर्जदार मागासवर्गिय असल्यास जातीचा दाखला किंवा तत्सम पुरावा
८. अर्जदाराचा रहिवासी दाखला
९. अतिक्रमण जमिनीबाबत अतिक्रमणदाराने कर भरले बाबत भरणा ७/१२ व ८ अ चे उतारे
१०. अतिक्रमित जमिनीबाबत अतिक्रमणदाराने कर भरले बाबत भरणा पावती व त्या संबंधी इतर कागदपत्रे.
११. अतिक्रमणाबाबत महसुली पुरावे व इतर कागदपत्रे.
२. निर्णय घेणारे अधिकारी :-
शासकीय पड शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमित करणेसाठी निर्णय घेण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी/ विभागीय आयुक्त / व शासन यांना आहेत.
३. संबंधित विषयाबाबत महत्वाचे शासन निर्णय :-
१. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९७१ – सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे नियम ४३ वमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५० व ५१
२. शासन निर्णय व वन व महसूल विभाग क्र. एलइएन १०९० / प्र.क्र. १७२ / ज-१, दिनांक २८-११-१९९१
३. शासन निर्णय व वन व महसूल विभाग क्र. एलइएन १०/२००१ प्र.क्र.२२५ / ज-१, दिनांक ०४-०४-२००२
४. शासन निर्णय व वन व महसूल विभाग क्र. एलइएनल १० / २००४ प्र.क्र. ४९ / ज-१, दिनांक ०९-मार्च-२००७
५. शासन निर्णय व वन व महसूल विभाग क्र. जमीन ०३/२०११ प्र.क्र. ५३ / जमीन -१ दिनांक १२ – जुलै -२०११
वरील शासननिर्णय व परिपत्रकाच्या सूचना, कार्यपद्धतीद्वारे शासकीय पड व गायरान जमिनीवरील शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण नियमित करून देण्यात येते.
