विविध योजनांची माहिती –
विविध योजनांची माहिती –
* इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना :
पात्रता – वय वर्ष ४० च्या पुढील व ५९ वर्षाआतील विधवा
कागदपत्रे –
१) दारिद्रय रेषेखालचा दाखला
२) पतीचा मृत्यू नोंद दाखला
३) वयाचा दाखला – ग्रामीण रुग्णालय किंवा शाळा सोडल्याचा दाखला
४) रहिवाशी तलाठी किंवा ग्रामसेवक यांचा दाखला
५) तहसीलदार यांच्या सही शिक्का सह उत्पन्नाचा दाखला
६) रेशन कार्ड झेरॉक्स
७) आधार कार्ड झेरॉक्स
८) फोटो – २ पासपोर्ट साईज
मिळणारे फायदे – दरमहा १०००/- रुपये
* श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना :
पात्रता : वय वर्ष ६५ ते ६५ वर्षावरील स्त्री पुरुष
कागदपत्रे :
१) दारिद्र्यरेषेखालील असल्याचा ग्रामसेवकाचा दाखला
२) दारिद्र्यरेषेखालील नसल्याचा तहसीलदार यांचा २१ हजाराचे आतील उत्पन्नाचा दाखला.
३) रहिवासी दाखला किमान पंधरा वर्ष रहिवासी असलेला तलाठी चा दाखला.
४) वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालय किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
५) तहसीलदार यांच्या सही शिक्का सह उत्पन्नाचा दाखला
६) रेशन कार्ड झेरॉक्स
७) आधार कार्ड झेरॉक्स
८) फोटो दोन पासपोर्ट साईज
मिळणारे फायदे : दरमहा १०००/- रुपये
* राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
पात्रता : वय वर्ष १८ ते ५९ वर्ष
कागदपत्रे :
१) दारिद्रय रेषेतील असणे आवश्यक
२) कुटुंबातील कमावती व्यक्ती मयत असल्यास मयत झाल्यापासून एक वर्षाच्या आत तहसीलदार कार्यालयात अर्ज करणे आवश्यक
३) मयत व्यक्तीच्या मृत्यूचा दाखला
मिळणारे फायदे : फक्त एकदाच एक रकमी २०,०००/- रुपये
* इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्त वेतन योजना :
पात्रता : वय वर्ष ६५ व ६५ वर्षावरील स्त्री पुरुष
कागदपत्रे :
१) कुटुंबाचे नाव दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या यादीत असणे आवश्यक
२) रहिवासी असलेला तलाठी किंवा ग्रामसेवक यांचा दाखला
३) वयाचा दाखला ग्रामीण रुग्णालय किंवा शाळा सोडल्याचा दाखला
४) फोटो दोन पासपोर्ट साईज
५) रेशन कार्ड झेरॉक्स
६) तहसीलदार यांच्या सही शिक्का सह उत्पन्नाचा दाखला
मिळणारे फायदे : फक्त एकदाच एक रकमी २०,०००/- रुपये
* इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्त वेतन योजना :
पात्रता : १८ ते ५९ वर्षाखालील अपंग
कागदपत्रे :
१) जिल्हा शल्यचिकित्सक यांचा अपंगत्वाचा ८०% च्या वरचा दाखला
२) कुटुंबाचे नाव दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत असणे आवश्यक
३) वयाचा दाखला – ग्रामीण रुग्णालय किंवा शाळा सोडल्याचा दाखला
४) रहिवासी असलेला तलाठी किंवा ग्रामसेवक यांचा दाखला
५) तहसीलदार यांच्या सही शिक्का सह उत्पन्नाचा दाखला
६) फोटो दोन पासपोर्ट साईज
७) रेशन कार्ड झेरॉक्स
८) आधार कार्ड झेरॉक्स
मिळणारे फायदे : दरमहा ६००/- रुपये
* आम आदमी विमा योजना व शिष्यवृत्ती योजना :
पात्रता : वयाचा पुरावा घ्यावा/वय वर्ष १८ ते ५९ मधील भूमिहीन शेतमजूर/अडीच एकरापर्यंत बागायत जमीन धारक शेतकरी आणि त्यांचे इयत्ता नववी ते बारावी मध्ये शिकणारी दोन मुलं
लाभ :
१) शिष्यवृत्ती नववी ते बारावी मधील विद्यार्थ्यांना दरमहा रु. १००/-
२) विमाधारक लाभार्थ्यांना/नैसर्गिक मृत्युपश्चात रु. ३०,०००/-
३) विमाधारक लाभार्थ्यांच्या अपघाती मृत्युपश्चात रु. ७५,०००/-
४) विमाधारक लाभार्थ्यांच्या अपघातात दोन डोळे किंवा दोन्ही पाय किंवा दोन्ही हात निकामी झाल्यास रु. ७५,०००/-
५) विमाधारक लाभार्थ्यांचे अपघातात एक डोळा किंवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास रु. ३७,५००/-
(तुमच्या तालुक्यातील तहसिल कार्यालयात वरील योजनांबद्दल अधिक माहिती व लाभ मिळेल.)
