भूसंपादनातून होणारे कमी-जास्त पत्रक
भूसंपादनातून होणारे कमी-जास्त पत्रक
महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ मधील खंड १ व ४मध्ये कमी जास्त पत्राकाबाबत तरतूद केल्याप्रमाणे सर्व्हेनंबर/गटनंबरचे आकार व क्षेत्रामध्ये काही कारणांस्तव बदल झाल्यास गावच्या आकारबंदामध्ये बदल करण्यासाठी जो अभिलेख तयार केला जातो. त्यास कमी-जास्त पत्रक म्हणतात.
असे कमी – जास्त पत्रक साधारणपणे खालील प्रकरणी तयार करावे लागते.
१. शेत जमिनीचा वापर बिनशेती प्रयोजनासाठी करावयाचा असल्यास
२. मूळ भूमापनामध्ये गणितीय किंवा हस्तदोषाने निर्माण झालेली चूक (क्षेत्र दुरूस्ती)
३. बिनआकारी जमिनीवर आकारणी करणे (मूळ भूमापनाच्या वेळी आकारणी न केलेल्या जमीनी), मळई जमीनींचे प्रदान इ.
४. भूसंपादन
५. नदी पात्रातील मळई जमिनीची वाढ व घट
अशा प्रकरणी कमी जास्त पत्रक तयार करावे लागते. यामध्ये मूळ भूमापन क्रमांक,हिस्सा क्रमांक, जमिनीचा प्रकार, एकुणक्षेत्र, खराबा वर्ग,लागवडीखालील क्षेत्र, आकार इ.बाबतच्या मुळ नोंदीमध्ये हिस्याप्रमाणे दुरुस्ती करुन नोंदी घेतल्या जातात. म्हणजेच कमी जास्त पत्रकामध्ये भाग १ रकाना १ ते ८ (दुरूस्ती पूर्वीची स्थिती) व उर्वरित भागात दुरूस्तीनंतरची स्थिती असते.
कोणत्याही कारणास्तव गांव नमुना १ किंवा आकार बंदाचे गोषवाऱ्यातील क्षेत्र व आकार यामध्ये जेव्हा बदल करण्यात येतो. तो क.जा.प.चे माध्यमातूनच केला जातो. अशी क.जा.प.उप अधीक्षक भूमिअभिलेख, मंजुर करतात व उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील भूमापन अभिलेखात, नकाशात व आकारबंदाला नोंद घेऊन क.जा.प.ची एक प्रत उप अधीक्षक भूमि अभिलेख यांचे स्वाक्षरीने तहसिलदार यांचेकडे नकाशासह हक्क नोंदणी व गांव नमुना १ मध्ये नोंद घेण्यासाठी पाठविली जाते. सदर पत्रकास कमी जास्त पत्रक असे म्हणतात.
कोणत्याही कारणास्तव गांव नमुना १ किंवा आकार बंदाचे गोषवाऱ्यातील क्षेत्र व आकार यामध्ये जेव्हा बदल करण्यात येतो. तो क.जा.प.चे माध्यमातूनच केला जातो. अशी क.जा.प.उप अधीक्षक भूमिअभिलेख, मंजुर करतात व उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील भूमापन अभिलेखात, नकाशात व आकारबंदाला नोंद घेऊन क.जा.प.ची एक प्रत उप अधीक्षक भूमि अभिलेख यांचे स्वाक्षरीने तहसिलदार यांचेकडे नकाशासह हक्क नोंदणी व गांव नमुना १ मध्ये नोंद घेण्यासाठी पाठविली जाते. सदर पत्रकास कमी जास्त पत्रक असे म्हणतात.
कमी-जास्त पत्रक तयार करणेकामी आवश्यक कागदपत्र :-
१. भूमिसंपादन कायदा कलम ६ चा जाहीरनामा
२. निवाड्याची कारणापुरती प्रत
३. शेतसारा कमी करण्याचे भूसंपादन अधिकारी यांचे आदेश
४. संयुक्त मोजणी नकाशा
५. संयुक्त मोजणी पत्रक
६. ताबे पावतीची नक्कल
७. भूसंपादन करतेवेळी काही ठिकाणी सरकारी मालकीचे सर्व्हे नंबर, गट नंबर, ओढा, नाला, रस्ता, गायरान, इ. पैकी काही जमीन वर्ग कराव्या लागत असल्यास व त्या संपादित जमिनीमध्ये येत असल्यास सदर जमिनी जोपर्यंत मूळ सदरातून प्रकार दिल्या जात नाहीत अगर वर्ग होत नाहीत तोपर्यंत भूकरमापकांना कमी जास्त पत्रक तयार करून त्याचा अंमल घेता येत नाही.
भूसंपादन मोजणी करताना जे अनुक्रमांक दिले जाते ते अ,ब नुसार दिले जाते, म्हणजे संपादित जमिनीस नवीन गट नंबर/ सर्व्हे नंबर दिला जातो.
कमी-जास्त पत्रक तयार केल्यावर ते ग्राम नकाशाच्या करणापुरत्या ट्रेसिंगसह गावी अधिकार अभिलेखास अंमल घेणेसाठी तहसीलदार यांचेमार्फत तलाठी यांनी कमी-कास्ट पत्रकाचा अंमल गावाचे फेरफार नोंदवहीस नोंदीने घ्यावं. सक्षम प्राधिकाऱ्याने ती नोंद प्रमाणित करावी. प्रमाणित नोंदीनुसार याचा अंमल ७/१२ मध्ये घ्यावा. तसेच तलाठ्यांना कमी जास्त पत्रकासोबत ट्रेसिंगनुसार त्यांचेकडील गावाच्या नकाशात दुरुस्ती करावी. कमी-जास्त पत्रक ट्रेसिंगसह गावाचे अकार्बनडास जोडावे व त्यानुसार वसुलीची कार्यवाही करावी.
