भूमिहीन शेतमजूर यांना जमीन प्रदान करणे
जिल्हाधिका-यांना / उपविभागीय अधिका-यांना वर्ग दोनच्या भोगवटादारांना आपल्या जमिनी व्यक्तिश: कसण्यास कबूल असलेल्या आपल्या जवळच्या नातेवाईकांना देणगी म्हणून देण्याची परवानगी देण्याचा अधिकार आहे. मात्र, मालमत्तेवर हक्क सांगणारा एकही कायदेशीर वारस नसावा किंवा अशा रीतीने जमीन देणगी म्हणून देण्यास कोणत्याही वारसाची हरकत नसावी.
मागासवर्ग म्हणजे कोण ?
१. अनुसूचित जाती :-
म्हणजेच भारताच्या संविधानाचा अनुच्छेद ३४१ अन्वये अनुसूचित जाती म्हणून समजण्यात येत असतील अशा जाती वंश किंवा जमाती किंवा अशा जातीचे वंशाचे किंवा जमातीचे भाग किंवा त्यातील गट.
२. अनुसूचित जमाती :-
म्हणजेच भारताच्या संविधानाचा अनुच्छेद ३४२ अन्वये ३४२ अन्वये अनुसूचित जमाती म्हणून समाजण्यात येत असतील अशा जमाती किंवा जनजाती समूह किंवा अशा जमातीचे किंवा जनसाठी समूहाचे भाग किंवा त्यातील गट.
अनुसूचित जमातीतील व्यक्ती इतर व्यक्तींना स्वत:च्या मालकीच्या जमिनी हस्तांतरित करीत असल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे आलेल्या आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम ३६(२) अन्वये अधिसूचित क्षेत्रामध्ये अनुसूचित जमातीतील व्यक्तींच्या मालकीची जमीन हस्तांतरित करण्याच्या र्सा प्रकरणात परवानगी देण्यास जिल्हाधिका-याला शक्ती प्रदान करण्यात आली आहे. अनुसूचित जमातीतील व्यक्तींचे हितसंबंध अबाधित राखण्याच्या दृष्टीने क्वचितच व केवळ ख-याखु-या कारणासाठी जमीन हस्तांतरित करण्यास परवानगी देणे आवश्यक ठरेल. म्हणून कोणत्याही बाबतीत, शासनाच्या पूर्वमान्यतशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचे कलम ३६ (२) अन्वये जमिनींचे हस्तांतरण करण्यास परवानगी दिली जाउ नये. कलम ३६ च्या पोटकलम (२) च्या तरतुदींचा भंग करून करण्यात आलेल्या हस्तांतराच्या संबंधीच्या अधिकार अभिलेख्यातील नोंदी प्रमाणित करू नयेत आणि हस्तांतरण करून घेणाराचे नाव अधिकृत अभिलेखात नोंदू नये.
