जमीन खरेदी
जमीन खरेदी
फसवणूक टाळण्यासाठी उपाय
खुले प्लॉट, flat खरेदी करताना सदर बांधकाम, plotting संदर्भाने खालील महसुली संबंधित सरकारी कार्यालयातून बिनचुक पडताळून घेणे आवश्यक आहे
1 7/12 अभिलेख व त्या वरील जमीन मालक, विकसक या बद्दल तपशील
2 इतर अधिकार- भूसंपादन, ULC आदेश, नवीन शर्त, कुळ, 84 क, court लिस pendency
3 रस्ता- सरकारी रस्ते , DP मधील रस्ते
4 जमीन वन विभाग यांची आहे का
5 नदी नाला कॅनॉल या पैकी आहे का त्या संदर्भाने जल संपदा विभाग यांची noc आहे का
6 तलावा पासून 500 मीटर अंतरा मध्ये आहे का या साठी जल संपदा विभाग noc आहे का
7 पाट बंधारे प्रकल्पाचे लाभ क्षेत्रात आहे का या साठी जल संपदा विभाग noc आहे का
8 ऐतहासिक ,पुरातत्व वास्तू पासून 200 मीटर अंतरावर असल्यास पुरातत्व विभाग noc
9 राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात समाविष्ट आहे का या साठी वन विभाग noc
10 गावठाण/ घनदाट लोकवस्ती या पैकी आहे का
11 डोंगर माथा, डोंगर उतार क्षेत्रातील आहे का (कंटूर नकाशा पाहणे)
12 वीज सुविधा/ High Tension line
13 घन कचरा सांडपाणी विल्हेवाट- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निकषां नुसता आहे का ..
14 जमीन झोन दाखला, भाग नकाशा
-रमाकांत माने
