गहाळ झालेल्या ऐवजासाठी शपथपत्राची आवश्यकता नाही…
गहाळ झालेल्या ऐवजासाठी शपथपत्राची आवश्यकता नाही…
आपल्या काही महत्वाच्या वस्तू, ओळखपत्र, पारपत्र, धनादेश, परवाना प्रमाणपत्र असे ऐवज हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास आपण पोलिसात तक्रार करायला गेल्यानंतर पोलिसांकडून कागदपत्र गहाळ झाल्याबाबत नोटरीकडून शपथपत्र (Affidivate) करून आणण्यास सांगितले जाते.
गहाळ झालेल्या वस्तू अगर कागदपत्राबाबत शपथपत्र घेण्याची कोणतीही तरतूद प्रचलित कायद्यामध्ये नाही तरी देखील पोलिसांकडून शपथपत्राची मागणी केली जाते व तक्रारदाराची अडवणूक केली जाते. ही बाब जर पुन्हा निदर्शनास आली तर संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर खातेनिहाय कारवाई करणार असल्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काढले आहेत.
● हा एक चांगला निर्णय असून, आयुक्तांच्यापर्यंत लोकांचा आवाज जातोय हे दिसते आहे.
परंतु खालील गोष्टींच्याबाबतही खुलासात्मक पत्रक निघणे आवश्यक आहे.
– मोबाईल हरवतात की चोरतात यावर खुलासात्मक पत्रक निघणे आवश्यक असून.
– मोबाईल चोरीला गेल्यानंतर बऱ्याचदा पोलीस FIR नोंद न करता हरवला असल्याचे लिहून घेतात व एफआयआर नोंद करून घेत नाहीत.
– अशाप्रकारे चोरांचे प्रमाण अतिशय जास्त असून एफआयआर नोंद न केल्यामुळे हे चोर मोकाट रहातात.
– मुंबई मध्ये गर्दीच्या ठिकाणी हमखास मोबाइल चोरी व पाकिटमारी होते.
