आजऑनलाईन ७/१२ आता निरुपयोगी
आज “ऑनलाईन ७/१२ आता निरुपयोगी” ही पोस्ट लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा आधार घेऊन करण्यात आली होती त्यात काही त्रुटी असल्याचे एका वाचकाने निदर्शनास आणून दिले.
● १९.१२.२०१९ च्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या शासन परिपत्रकातील सूचना फक्त विनास्वाक्षरीत व फक्त माहितीसाठी (मोफत) उपलब्ध असणाऱ्या ७/१२ बाबत महा-ई-सेवा केंद्र चालकांकडून गैरप्रकार होवू नयेत म्हणून दिलेल्या सूचना आहेत. अनेक ठिकाणी हेच मोफत मिळणारे ७/१२ वर सही शिक्का करून महा-ई-सेवा केंद्रांकडून खातेदारांना विकून पैसे घेतले जात होते व त्यांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आलेने या सूचना माहिती तंत्रज्ञान विभागाने निर्गमित केल्या आहेत.
● डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वर क्यूआर कोड व १६ अंकी पडताळणी क्रमांक देखील छापला असून ते https://aapleabhlekh.mahabhumi.gov.in/dslr या लिंकवरून उपलब्ध होणारे सर्व डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ सर्व कायदेशीर व शासकीय कामासाठी ग्राह्य असलेबाबत चे परिपत्रक देखील जमाबंदी आयुक्त यांनी दिनांक १९/६/२०१९ राजी निर्गमित केले आहे. या दोन्ही प्रकारच्या ७/१२ वर कोणता ७/१२ कायदेशीर व शासकीय कामासाठी ग्राह्य समजला जातो आहे व कोणता नाही ? हे स्पष्टरित्या नमूद केले आहे.
● शासनाच्या महाभूमी (https://mahanbumi.gov.in) या संकेतस्थळावरून डिजिटल स्वाक्षरीत व विनास्वक्षारीत असे दोन्ही ७/१२ उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी विनास्वक्षारीत ७/१२ फक्त माहितीसाठी (view only वाटरमार्क सह) https://bhulekh.mahabhumi.gov.in या लिंकवर मोफत उपलब्ध आहेत आणि सर्व शासकीय व कायदेशीर कामासाठी लागणारे डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ प्रत्येकी १५ रुपये प्रमाणे नक्कल फी ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे भरून https://aapleabhlekh.mahabhumi.gov.in/dslr या लिंकवरून उपलब्ध आहेत
● १९/०६/२०१९ रोजी जमाबंदी आयुक्त यांनी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकात खालील गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत-
विषय: संगणकीकृत ७/१२ उतारे व खाते उताऱ्यांच्या अनधिकृत वापराबाबत
महाभूमि/ महाभूलेख संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात आलेले विनास्वाक्षरीत ७/१२ व ८ अ ( खाते उतारा) जनतेला फक्त माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, ते कोणत्याही कायदेशीर अथवा शासकीय कामासाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे स्पष्ट सूचना त्यावर देण्यात आली आहे. तथापि असे असताना काही सेतू, महा-ई सेवाकेंद्र अथवा संग्राम केंद्र चालक या माहितीसाठीच्या ७/१२ व खातेउतारा प्रिंट करून त्यावर स्वतःचा सही, शिक्का करून विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही बँका, सोसायटी, संस्था व दुय्यम निबंधक स्थरावर हे अभिलेख ग्राह्य मानून व्यवहार/ कामे करत असल्याचे दिसून येते. हे पूर्णतः अयोग्य व बेकायदेशीर असल्याचे खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करणेत येत आहे.
१) महाभूलेख/महाभूमि संकेतस्थळावरून गावनमुना ७/१२ व ८अ (ज्या ७/१२ व ८अ वर View only watermark असेल) ची माहिती फक्त महितीसाठी असून त्याची प्रिंटआऊट कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर कामासाठी ग्राह्य मानण्यात येणार नाही.
२) कोणत्याही सेतूचालक, महा-ई सेवाकेंद्र अथवा संग्राम केंद्र चालक अथवा अन्य व्यक्ती महाभूलेख/ महाभूमि संकेतस्थळावरून गावनमुना ७/१२ व ८ अ सही शिक्का करून वितरीत करणार नाही. असे केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित तहसीलदार यांनी त्याबाबत रितसर चौकशी करून जिल्हाधिकारी यांचे कडे प्रस्ताव सादर करावा व जिल्हाधिकारी यांनी अशा व्यक्ती/ संस्था/ केंद्र चालका विरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.
३) कोणत्याही व्यक्ती/ संस्था/ कार्यालयाकडे प्राप्त संगणकीकृत अधिकार अभिलेखाच्या प्रती वरील माहितीची सत्यता महाभूलेख/ महाभूमि या संकेतस्थळावरून ऑनलाईन करता येईल.
४) कोणत्याही कायदेशीर अथवा शासकीय कामासाठी उपयोगात येणाऱ्या डिजीटल स्वाक्षरीत ७/१२ ची पडताळणी httpts://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/satabara या संकेतस्थळावर ७/१२ वर छापलेल्या सांकेतांक क्रमांक वरून करता येईल.
***********************************************
आजच्या ह्या चुकीसाठी आम्ही कायदादूत तर्फे दिलगिरी व्यक्त करतो. जर तुम्हाला कधी लेखातील माहितीमध्ये चूक आढळून आली, तरी आम्हाला नक्की कळवा.
धन्यवाद
Enable GingerCannot connect to Ginger Check your internet connection
