विवाह प्रमाणपत्र / विवाह दाखला आवशक्य माहिती
कोर्ट केसेस, वारसाहक्क, रेशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे अथवा कमी करणे,पासपोर्ट,गोत्र परिवर्तन आदी कारणांसाठी विवाह प्रमाणपत्राची आवश्यकता असते. विवाहासाठी पुरुषाचे वय २१ व स्त्रीचे वय १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.विवाह नोंदणी विवाह तारखेपासून ९० दिवसांच्या आत करावी.जर ९० दिवसांपेक्षा काही कारणास्तव उशीर झाल्यास दंड रक्कम भरून नोंदणी करता येते.विवाह नोंदणी अधिनियान्व्ये वर किंवा वधू ज्या ठिकाणी राहतात त्यापेकी एक विवाह निबंधकाचे कार्यालयात नोंदवायची आहे.विवाह निबंधकाचे कार्यालय तहशील कार्यालयात असते.
- नोंदणीसाठी १०० रु किंवा निश्चीत केलेले शुल्काची कोर्ट फी स्टॅम्प अथवा कार्यालयाच्या पध्दतीप्रमाणे भरावे.विवाह नोंदणीसाठी वर वधू यांच्या सह तीन साक्षीदार ओळखपत्र पासपोर्ट साईज रंगीत फोटो सह सादर करावे.
विवाह नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- वर व वधू यांचा रहिवासी पुरावा ज्यात रेशन कार्ड,दूरध्वनी बिल,वीज बील,पासपोर्ट यांच्या मूळप्रतीसह झेरॉक्स सत्यप्रत वर व वधू यांचा वयाचा दाखला उदा.शाळा सोडल्याचा दाखला,जन्माचा दाखला यांच्या मूळ प्रतीसह सत्यप्रती.
- लग्नाची निमंत्रण पत्रिका जर लग्नाची निमंत्रण पत्रिका नसल्यास वर वधू तीन साक्षीदार व पुरोहित यांचे ठराविक नमुन्याप्रमाणे जनरल स्टॅम्प रु.१०० वर प्रतिज्ञा पत्र व लग्नविधीचे प्रसंगीचे फोटो.
- तीन साक्षीदार रहिवासी पुरावे उदा.रेशनकार्ड,पासपोर्ट,मतदान,ओळखपत्र यांची मूळप्रतीसह सत्यप्रत.
- वर वधू घटस्पोटीत असल्यास कोर्टाचे हुकुमनाम्याची सत्यप्रत.
- वर वधू विधुर विधवा असल्यास संबंधित मयत व्यक्तीचे मृत्यू दाखला व त्याची सत्यप्रत जोडावी.
- वरील बाबींची पूर्तता करून विवाह निबंधक यांचेकडून विवाह प्रमाणपत्र नमुना इ.आय मधील मागणी करून घ्यावे.